नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या खटल्यासंदर्भात दिलेला ऐतिहासिक निकाल हा माझ्यासाठी इच्छापूर्तीचा क्षण असल्याची भावनिक प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रामजन्मभूमी आंदोलनातील प्रमुख सूत्रधार लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक अशा अयोध्या खटल्याचा निकाल जाहीर केला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात येईल, असे निर्देश यावेळी न्यायालयाने दिले. तर सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी अयोध्येतच पाच एकर पर्यायी जागा देण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 


या पार्श्वभूमीवर अडवाणी यांनी म्हटले की, स्वातंत्र्यलढ्यानंतर देशातील सर्वात मोठ्या जनआंदोलनात सहभागी होण्याची संधी ईश्वराने मला दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने राम मंदिराची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी एकमताने दिलेला कौल हा माझ्यासाठी इच्छापूर्तीचा क्षण आहे. 


व्हिडिओ : असं असेल अयोध्येतलं भव्य 'नागाशैली' राममंदिर



१९९२ सालच्या बाबरी मशीद पतन प्रकरणात अडवाणी यांच्यावर खटला दाखल झाला होता. मात्र, आजच्या निकालानंतर माझ्यावरील हा ठपका दूर झाल्याचेही अडवाणी यांनी सांगितले. 


तत्पूर्वी अयोध्या खटल्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी अडवाणी यांची भेट घेतली. अडवाणी यांच्या राम मंदिराविषयीची निष्ठाच भाजपच्या यशाचे गमक असल्याचे उमा भारती यांनी म्हटले. 


अयोध्येत शास्त्रीयदृष्ट्या 'राम' शोधणारा 'मोहम्मद'


अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या खटल्याची घटनापीठापुढे सलग ४० दिवस सुनावणी झाली. ही सुनावणी १६ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला होता.