मुडीजच्या पतमानांकनाचा परिणाम, सेन्सेक्सने घेतली उसळी
शेअरबाजारातील सेंन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकामध्ये चांगलीच वाढ झाली.
मुंबई : शेअरबाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकानी चांगलीच वाढ झाली. सेन्सेक्समध्ये २३५.९८ अंकाची तर निफ्टीमध्ये ६८.८५ अंकाची वाढ झाली.
शेअरबाजारात उत्साह
अमेरिकेच्या मुडीज या संस्थेने भारताच्या पतमानांकनात वाढ केल्याने बाजारात तेजीचं वातावरण आहे. गेले कित्येक दिवस टीकेला तोंड देणाऱ्या केंद्र सरकारमध्ये या निमित्ताने उत्साहाचं वातावरण आहे.
डॉ. मनमोहन सिंग काय म्हणाले
मुडीजने दिलेल्या पतमानांकनामुळे आनंद आहे. मात्र देशाची अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली आहे या भ्रमात कोणीही राहू नये असा सल्ला भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिला आहे. विकासदर वाढवण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलयं.
काँग्रेसच्या कपिल सिब्बल यांची प्रतिक्रिया
केंद्र सरकारने आत्मस्तुतीपेक्षा रोजगार वाढीकडे लक्ष द्यावे, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलयं.