नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१८ सालचा सेऊल शांती पुरस्कार देण्यात येणार आहे. भारत आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतल्या विकासाबाबत दिलेल्या योगदानाबाबत मोंदीना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेऊल पीस प्राईज कल्चर फाउंडेशनने याची नुकतीच घोषणा केली. जगभरातल्या १०० व्यक्तींमधून मोदींच्या नावाची घोषणा करण्यात आली.पंतप्रधान मोदींना हा सन्मान भारत आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा विकास आणि यामाध्यमातून श्रीमंत आणि गरीब यांच्यात सामाजिक आणि आर्थिक असमानता कमी करणे, अंतरराष्ट्रीय सहयोग, भ्रष्टाचार विरोधी आणि सामाजिक एकीकरण यामाध्यमातून लोकशाहीचा विकास यामुळे हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना देण्यात येणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्मान चिन्ह, 2 लाख डॉलर म्हणजेच 1.46 कोटी रुपये या पुरस्कारासोबत दिले जाणार आहे. निवड समितीचे अध्यक्षांनी म्हटलं की, '12 सदस्य असलेल्या समितीने जगभरातील 100 हून अधिक लोकांमधून पंतप्रधान मोदी यांची निवड केली आहे.'


शांती पुरस्काराशी संबंधित असलेल्या निवड समितीचे अध्यक्ष चो चुंग यांच्या मते, 'सेऊल शांती पुरस्कारासाठी जगभरातील 100 लोकांमध्ये टक्कर होती. ज्यामध्ये अनेक माजी राष्ट्राध्यक्ष, नेते, उद्योगपती, धार्मिक नेते, संशोधक, पत्रकार, कलाकार, एथलीट्स आणि अंतर्राष्ट्रीय संस्था यांचा देखील समावेश आहे. समितीने मोदी हेच मजबूत उमेदवार असल्याचं म्हटलं. आणि त्यांना 14 वा सेऊल शांती पुरस्कार जाहीर करण्यात आला.'