Serial Kisser Gang : `तो` एकटा नव्हता, तर `सिरियल किसर गँग`, महिलांना लिप लॉक करणाऱ्या `त्या` टोळीने...
Bihar Serial Kisser Video : महिलांना एकटं पाहून तो त्यांच्या ओठावर चुंबन घ्यायचा आणि पळून जायचा...यामुळे शहरातील महिलांना दहशत पसरली होती. आता पुन्हा ही सिरियल किसर प्रकरण चर्चे आलं आहे.
Serial Kisser Gang Viral Video : घराबाहेर पडायला पण महिला आणि तरुणी घाबरत होतो कारण शहरात सिरियल किसर फिरत होता. तो महिलांना एकट पाहून त्यांच्यावर हल्ला करायचा...त्यांना लिप लॉक करुन त्यांच्यावर अत्याचार करत होता. रुग्णालयाबाहेर एका महिला किस करतानाचा व्हिडीओ समोर आला (Bihar Serial Kisser Viral Video) आणि शहरात एकच खळबळ माजली...या घटनेनंतर महिला आणि तरुणींमध्ये एकच दहशत पसरली होती. आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
तो एकटं नव्हता तर...
आपण सगळ्यांनी सिरियल किलर हा शब्द ऐकलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सिरियल किसर हा शब्द महिलांच्या मनात भीती निर्माण करतो आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला बिहारमधील जमुईमधील सिरियल किसरच्या घटनेबद्दल सांगितलं होतं. ज्या एक व्यक्ती महिला किंवा तरुणींना एकट्यात गाठून त्यांना जबरदस्ती किस करायचा. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा झाला आहे. तो एक नाही तर ती अख्खी टोळी होती...(serial kisser gang police arrested man kissing women and girls video bihar Crime News in marathi )
'सिरियल किसर गँग'!
हो सिरियल किसर गँग...पोलिसांनी या टोळाचा पर्दाफाश केला आहे. रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी या टोळीचा म्होरक्या आणि चार साथीदारांना गजाआड केलं आहे. पोलीस सूत्रांनुसार ही गँग दिवसा महिलांसोबत छेडछाड करायचे आणि नंतर रात्रीच्या वेळी शहरात दरोडा टाकायचे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन चोरीचा उलगडा करण्यासाठी त्यांनी एका ठिकाणी धाड टाकली. मात्र तिथे त्यांना सिरियल किसर आणि त्याचा गँगचा पर्दाफाश झाला. या गँगच्या म्होरक्याचं नाव मो. अकर असून तो महिसौढी मुहल्ला इथला राहणारा होता. त्यांच्याकडील सामान जप्त करण्यात आलं असून इतर सदस्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
या टोळ्यातील म्होरक्याने जमुईमधील रुग्णालयातील महिलेची छेड काढली होती. हा प्रकार हॉस्पिट परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला होता. ही घटना 10 मार्च 2023 ची होती. तेव्हा पासून पोलीस त्याचा शोधात होते. अखेर त्याला आणि त्याचा टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे.