Covishield Astrazeneca: कोविशील्डवरुन आता नवीन वाद सुरु आहे. या दरम्यान एस्ट्राजेनेकाने व्हॅक्सीनची पुन्हा मागणी केली आहे. एस्ट्राजेनेकाने भारतात सीरम इंस्टिट्यूटसोबत ही लस तयार केली होती. आता या प्रकरणात सीरम इंस्टिट्यूटचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. कंपनीने यामध्ये म्हटलं की, कोरोनानंतर उपलब्ध असलेल्या लस या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या पुन्हा मागण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने हे मान्य केलं आहे की, या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असून प्लेटलेट देखील कमी होत आहेत. याबरोबरच सीरमने म्हटलं की, एसआयआयने म्हटलं की, डिसेंबर 2021 मध्ये कोविशील्डने अधिकच्या लसीचे उत्पादन आणि पुरवठा थांबवला आहे. 


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पुनरुच्चार केला की, 2021 मध्ये त्यांनी पॅकेजिंगमध्ये सर्व दुर्मिळ ते अत्यंत दुर्मिळ दुष्परिणामांची माहिती दिली आहे. ज्यात रक्ताच्या गुठळ्या तसेच कमी प्लेटलेट्स यांचा समावेश आहे. AstraZeneca ने लस विकसित करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाशी भागीदारी केली होती. या लसी भारतात Covishield आणि युरोपमध्ये ‘Vaxjaveria’ या नावाने विकल्या जात होत्या.


एस्ट्राजेनेकाद्वारे पुन्हा मंजुरी 


युरोपियन युनियनच्या औषध नियामक, युरोपियन मेडिसिन एजन्सीने मंगळवारी एक नोटीस जाही करून पुष्टी केली. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, AstraZeneca ने मार्चमध्ये मंजूरी मागे घेतल्यानंतर वॅक्सजाव्हरिया यापुढे EU च्या 27 सदस्य राज्यांमध्ये वापरण्यासाठी अधिकृत नाही. AstraZeneca च्या निवेदनात म्हटले आहे की, ते व्हॅक्सझेव्हरियासाठी मार्केटिंग मंजूरी मागे घेण्यासाठी जगभरातील नियामक प्राधिकरणांसोबत काम करेल.


अधिक संख्येने लस उपलब्ध


AstraZeneca च्या निवेदनात असेही म्हटले आहे की, AstraZeneca ने वॅक्सझेव्हरियासाठी युरोपमधील विपणन मान्यता मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आता हा धडा बंद करण्यासाठी नियामक आणि आमच्या भागीदारांसोबत काम करू आणि COVID-19 साथीच्या आजारामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्याच्या स्पष्ट मार्गावर पुढे जाऊ. अनेक प्रकारच्या कोविड-19 लसी विकसित केल्या गेल्या असल्याने उपलब्ध लसींची संख्या जास्त आहे, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. 


लोकांच्या आरोग्याची काळजी


जगभरातील चिंतेच्या ज्यामध्ये एस्ट्राझेनेकाने आता त्याच्या सर्व लसी परत मागवल्या आहेत. भारतातील करोडो लोकांना कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कोविशील्ड लस मिळाली आहे. लसीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर लोकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे. मात्र, जास्त काळजी करण्याची गरज नसल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.