नवी दिल्ली: विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडीया आणि त्यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. यात तोगडीया यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय राघव रेड्डी हे विश्व हिंदू परिषदेची (विहिंप)  आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पराभूत झाले आहेत. तर, हिमाचलचे माजी गव्हर्नर विष्णू सदाशिव कोकजे हे विजयी झाले आहेत. त्यातच तोगडीया आणि राघव रेड्डी किंवा त्यांच्या गटाला विहिंपमध्ये कोणतीही नवी जबाबदारी मिळाली नाही. त्यामुळे विहिंपमधून तोगडिया युगाचा अंत झाल्याचे मानले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगितले जात आहे की, विहिंपमध्ये पहिल्यांदाच निवडणुकीचा प्रयोग करणे हा तोगडीया यांचा विहिंपवरील प्रभाव संपविण्याचाच एक प्रयत्न होता. दरम्यान, केंद्र सरकार आणि कासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तेट टीका केल्याने संघ परिवार आणि भाजप त्यांच्या नेतृत्वावर नाराज होता. विहिंपच्या घटनेनुसार आंतरराष्ट्रीय अध्यक्ष हाच कार्यकारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करत असतो. विशेष असे की, विहिंपच्या ५४ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच निवडणुक लढवून अध्यक्षपद  निवडवले गेले आहे.


कोकजे यांच्याकडे पदभार गेल्यावर प्रदीर्घ काळानंतर विहिंपमध्ये मोठे बदल झालेले दिसतील, अशी चर्चा आहे. मावळते अध्यक्ष प्रविण तोगडीया हे दीर्घ काळापासून विहिंपचा चेहरा राहिले आहेत. राघव रेड्डी यांनीच त्यांना ही सूत्रे दिली होती. संघटनेतील लोकांची चर्चा आहे की, रेड्डी आणि तोगडीया हे दोघेही एकमेकांचे समर्थन करत आले आहेत आणि दोघांनी मिळून संघटनेवर जोरदार पकड निर्माण केली होती.