सेक्स रॅकेट उद्धवस्त, ९ जणांना अटक
येथील मॉलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
गुरूग्राम : येथील मॉलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
गुरूग्राम पोलिसांच्या प्रवक्ता रविंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी गुरूग्राम येथील सेक्टर ५० मधील ओमेक्स मॉलमधील एका स्पावर छापा टाकला. या ठिकाणी अवैध पद्धतीने सेक्स रॅकेट सुरू होते.
या संदर्भात पोलिसांनी एक टीम तयार केली. त्यात ग्राहक म्हणून ऑस्टर स्पा सेंटरमध्ये गेले. यावेळी संशयास्पद गोष्टी दिसल्या. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात सहा तरूणींसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
या स्पाच्या मालकाला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.