हैदराबाद : हैदराबादमध्ये सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलेय. यात दोन अभिनेत्रींसह चार जणांना अटक करण्यात आलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंजारा हिल्स भागातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकत चार जणांना अटक केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक बॉलीवूड अभिनेत्री तर आणखी एका टेलिव्हिजन अभिनेत्रीचा समावेश आहे. याशिवाय दोन दलालांनाही अटक करण्यात आलीये. ऑनलाईन रॅकेट चालवत होते. 


दरम्यान, या दोन अभिनेत्रींची ओळख उघड करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या या दोनही मुलींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. 


पोलिसांना या हॉटेलमध्ये रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार ताज डेक्कन हॉटेलच्या रुममध्ये छापा मारण्यात आला. यानंतर याच परिसरातील अन्य एका हॉटेलमधून टीव्ही अभिनेत्रीसह दोन अन्य लोकांना अटक कऱण्यात आली.