अल्पवयीन पत्नीसोबत संबंध ठेवणे बलात्कारच : सर्वोच्च न्यायालय
अल्पवयीन पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
नवी दिल्ली : अल्पवयीन पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालामुळे यापुढे अल्पवयीन पत्नीसोबतचे शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार समजला जाईल. जर पतीने १५ ते १८ वर्षांच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवल्यास तो बलात्कार समजण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात नमूद केले.
त्याचवेळी सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठीचे वय कमी केले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. यासोबतच सज्ञान व्यक्तीसाठीची १८ वर्षांची मर्यादा कमी केली जाऊ शकत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.
अल्पवयीन मुलीसोबत तिच्या पतीने शारीरिक संबंध ठेवल्यास तिला याबद्दलची तक्रार वर्षभरात दाखल करावी लागेल. दरम्यान, बालविवाहाच्या प्रथेबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केलेय. सामाजिक न्यायासंबंधीचे कायदे ज्या भावनेने तयार केले जातात, त्या भावनेने ते लागू केले जात नाहीत, अशी नाराजी न्यालयाने व्यक्त केली.
ठळकबाबी
- अल्पवयीन पत्नीसोबत शारिरीक संबंध बनवणे म्हणजे लैंगिक अत्याचार
- शारीरिक संबंध ठेवल्यास लैंगिक अत्याचार होईल
- १५ ते १८ वयातील पत्नीशी संबंध ठेवणे असंवैधानिक
- आयपीसी चे कलम ३७५ (२) च्या वैधानिकतेवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल
- यापूर्वी ३७५ (२) नुसार १५ ते १८ वयोगटातील नाबालिक पत्नी सोबत शारिरीक संबंध ठेवणे चुकीचे मानत जात नव्हते
- विवाहीत आणि आणि अविवाहीत १५ ते १८ वयोगटातील मुलींसोबत भेदभाव करत असून हे कलम रद्द करण्याची मागणी