केरळ : केरळमध्ये शबरीमला मंदिरात जाऊन बिंदू आणि कनकदुर्गा या दोन महिलांनी अय्यपा देवाचे दर्शन घेतले. यानंतर तात्काळ मंदिर शुद्धीकरण करण्यात आले. स्थानिक आणि कट्टर हिंदुत्व वाद्यांकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला तसेच केरळ बंदची हाक देण्यात आली. गुरूवारी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये जुंपलेली पाहायला मिळाले. या आंदोलनाला हिंसक वळण आल्याने राज्यपाल पी सदाशिवम यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडे कायदा व्यवस्थेचा अहवाल मागितला. या माहितीनुसार या प्रकरणात राज्याभरात 100 हून अधिक जण जखमी झाले. यामध्ये 21 पोलिसांचा देखील समावेश आहे.


दगडफेकीत मृत्यू 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशस डेमोक्रॅटीक पार्टी आणि इंडियाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या हाणामारीत भाजपाच्या 3 कार्यकर्त्यांवर चाकून वार झाले आहेत. 55 वर्षीय चंद्रन उन्नीथन यांच्या मृत्यू नंतर याला हिंसक वळण आले. चंद्रन हे शबरीमला कर्मा समितीचे कार्यकर्ता होते आणि सीपीएम कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचा मृत्यू कार्डियाक अरेस्टने झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी आधी सांगितले होते. मात्र पोस्टमार्टमच्या अहवालानुसार गंभीर जखमी झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 


केरळमधील अनेक शहरांमध्ये राज्य परिवहनाच्या बस चालत नाही आहेत. खासगी वाहनेच रस्त्यावर दिसत आहेत. सरकारतर्फे कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन केल जाणार नाही. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.