VIDEO : कॉलेजमधून परतणाऱ्या मुलीची रोडरोमियोंकडून छेडछाड
ओडिसाच्या बारगड जिल्ह्यातील एका कॉलेज विद्यार्थिनीसोबत छेडछाड झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण
नवी दिल्ली : ओडिसाच्या बारगड जिल्ह्यातील एका कॉलेज विद्यार्थिनीसोबत छेडछाड झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधिक चिंतेत आली आहेत. पोलिसांनी या प्रकरणात ६ लोकांना अटक केलं आहे. ओडिसामध्ये कॉलेजमधून येणाऱ्या मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. या विद्यार्थिनीची भर रस्त्यात छेड काढण्यात आली आहे. या व्हिडिओतील आरोपींनी आपला चेहरा कपड्याने गुंडाळला आहे. या मुलांनी मुलीची छेड काढली असून तिच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली आहे.
बारगडमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केलं आहे. पोलिसांना ३ डिसेंबर रोजीचा हा व्हिडिओ आहे.
या व्हिडिओत आपण पाहू शकता एक तरूणी सारखी विनंती करूनही काही रोडरोमियोंचा ग्रुप तिला त्रास देत आहे. तसेच तिच्यासोबत छेडछाड करत आहे. या मुलांनी कपड्याने आपला चेहरा झाकला आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता अनेकदा विनंती केल्यानंतरही हे रोडरोमियो ऐकत नाही आहेत तर सतत तिची छेड काढत आहेत. तसेच त्या तरूणीसोबत असलेल्या मुलाला देखील त्यांना मारहाण केली आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी मेलचामुंडा - पद्मापूर रस्त्यावर घडलेली आहे.
पद्मापूर उप विभागीय पोलिस अधिकारी लक्ष्मीनारायण पांडा यांनी सांगितले की, या घटनेतील चार प्रमुख आणि इतर २ व्यक्तींना अटक केली आहे. तसेच इतर रोडरोमियांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. शनिवारी या व्हिडिओवरील घटनेवर कारवाई करण्यास सांगितली आहे.
या आरोपींवर ३४१, ३५४, ३५४ ब आणि ३४ असे कलम लागून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेतील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.