अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामांच्या कामांचा धडाका लावला होता. गुजरातमध्ये कोणाची सत्ता येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पण त्याआधीच गुजरातमधील एका मोठ्या नेत्याने मोठी घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शंकर सिंग वाघेला यांनी गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी म्हटलं की, गुजरातमधील निवडणुकीसाठी ते अंबानी किंवा अदानी यांच्याकडून देणगी घेणार नाही. सोबतच त्यानी पक्षाचं चिन्ह देखील जाहीर केलं. वाघेला यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम करत जन विकल्प पक्षात प्रवेश केला होता.


जन विकल्प मोर्चा हा ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पक्षाच्या ट्रॅक्टर या चिन्हावर निवडणुका लढवणार आहे. त्यांनी म्हटलं की, 'जर आमची सत्ता आली तर आम्ही 5000 रुपये पेन्शन विधवा महिलांना देऊ. आम्ही कोणत्याही प्रकारे अंबानी किंवा अदानी यांच्याकडून देणगी नाही घेणार. निवडणुकीत 'आम्ही स्वच्छ उमेदवार मैदानात उतरवणार. उमेदवारांना त्यांच्या क्षमतेनुसार तिकीट देणार. इतर पक्षाप्रमाणए पैशांच्या आधारावर नाही.