नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची भेट घेतली. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत ही पवारांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. (Sharad pawar answer on UPA chairperson)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी शरद पवार यूपीएचे अध्यक्ष (UPA chairperson) होणार अशी चर्चा सुरु होती. यावर आता खुद्द शरद पवार यांनीच नकार दिला आहे. शरद पवार यांनी म्हटलं की, यूपीए नेतृत्वाची मागणी राष्ट्रवादीनं केलेली नाही. यूपीए नेतृत्वासाठी मी स्वतःच तयार नाही. सध्याचा सेटअप बिघडवायचा नाही. असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे. त्यामुळे आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.


शरद पवार यांची यूपीएच्या अध्यक्षपदी निवड करण्याची मागणी राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या काही नेत्यांकडून देखील करण्यात आली होती. शरद पवार म्हणाले की, मी इतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते करणार आहे.'


'मी आघाडीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही. अलीकडेच, आमच्या युवकांनी मला यूपीए प्रमुख बनवण्याचा ठराव पास केला. मला त्यात शून्य रस आहे. मी यात अडकणार नाही. मात्र, या संदर्भात प्रयत्न झाले, तर मी पाठिंबा, मदत आणि सहकार्य करण्यास तयार आहे.' असे  ही याआधी पवारांनी म्हटले होते.