नवी दिल्ली : शिवसेनेचे ( Shiv Sena) अनंत गीते  (Anant Geete) यांनी राष्ट्रवादीवर (NCP) घणाघात करताना शरद पवार (Sharad Pawar) हे आमचे नेते होऊ शकत नाहीत, असे म्हटले. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे. अनंत गिते प्रकरणावर मला विषय माहीत नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे राज्याचे नेते आहेत. गीते यांच्या वक्तव्याशी सरकारचा काहीही संबंध नाही. पवार हे देशाचे नेते आहेत, असे राऊत म्हणाले.


शिवसेनेचे अनंत गीते यांचा  घणाघात, पवार हे आमचे नेते नाहीत!


'सर्वांनीच ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


महाराष्ट्र राज्यातील सरकार (Mahavikas Aghadi Government) उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) चालवत आहेत. सर्वांनीच ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. सत्ता गेली की विरोधी पक्षाने जनतेशी द्वेष भावनाने वागणे योग्य नाही. किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही. ठाकरे परिवार हे कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारे सरकार आहे. आम्हाला नियम कायदे माहिती आहेत. कोणी चिखल उडवत असेल तर ते योग्य नाही, असे संजर राऊत म्हणाले.


राज्याचा विध्वंस करण्यासाठी विरोधक प्रयत्नात आहेत. एकमेकांना संपवण्याच राजकारण सुरु आहे. 2024 लोकसभा निवडणुकीसाठी समन्वय व्यक्तीगत स्तरावर असतो, त्यावर उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील असे ते म्हणाले.



दरम्यान, कुंभमेळा अयोध्या आंदोलन या हिंदुत्वाच्या लढाईत महंत पुढे असत. त्यांची आणि आमची भेट झाली आहे. एक हिंदुत्ववादी संघटना म्हणून आशीर्वाद मिळाले आहेत. अयोध्येत गेल्यावर त्यांचे आम्ही आशीर्वाद घेतले होते. आत्महत्या म्हणत असाल तर भक्तांना हत्या वाटते. महंत हत्या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी राऊत यांनी केली.