रायगड : शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस ( Congress) कधीच एक होऊ शकत नाहीत, असे सांगत शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते (Anant Geete) यांनी नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे. राष्ट्रवादीचा (NCP) जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. शरद पवार (Sharad Pawar) आमचे नेते होऊ शकत नाहीत, असा घणाघात केला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही केवळ तडजोड आहे, असे अनंत गीते म्हणाले. (Shiv Sena's Anant Geete's attack on NCP, Sharad Pawar cannot be our leader!)
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे अनंत गीते यांनी सेना नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे. दोन्ही काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर शिवसेना आणि काँग्रेस कदापि एक होऊ शकत नाहीत, असं अनंत गीते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय, असा घणाघात गीते यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठीची तडजोड असल्याची आठवण त्यांनी करून दिली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अज्ञात वासात गेलेले अनंत गीते पुन्हा रायगडच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. श्रीवर्धन इथं त्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबकर यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.