दिल्लीत शरद पवारांसह विरोधी पक्षाचे नेते सोनिया गांधींच्या भेटीला
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. संसदेतील रणनितीविषयी चर्चा करण्यासाठी ही बैठक आहे. दिल्लीतील १० जनपथला सोनिया गांधी यांच्याशी शरद पवारांनी भेट घेऊन चर्चा केली. दिल्लीत विरोधकांची देखील बैठक सुरु आहे संसदेतील रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक असल्याचं सांगण्यात येत आहे.
खासदार निलंबनावर आम्ही कुठलीही माफी मागणार नाही, पश्चाताप व्यक्त करणार नाही, असं या वेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
बैठकीला सीताराय येच्युरी, फारुख अब्दुल्ला, संजय राऊत, मल्लिकार्जुन खर्गे हे देखील शरद पवार यांच्यासह सोनिया गांधी यांच्या भेटीला गेले आहेत.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांची युती आहे,आज महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला. यात काँग्रेसचा पराभव झाला आहे, एकूण महाविकास आघाडीला हा फटका मानला जात आहे.