नवी दिल्ली: अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनासाठी मोदी सरकारकडून सुरु असलेल्या लगबगीच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांनी केलेल्या टिप्पणीवरुन आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरुन भाजपच्या फायरब्रँड नेत्या उमा भारती यांनी सोमवारी संताप व्यक्त केला. शरद पवार यांनी राम मंदिरासंदर्भात केलेले वक्तव्य हे मोदी विरोधी नव्हे तर श्रीरामाच्या विरोधात आहे, असा आरोप उमा भारती यांनी केला. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या अपयशावरुन लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराचं भूमिपूजन- काँग्रेस



महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून कालच शरद पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. मंदिर बांधून कोरोना बरा होत नाही, असे पवारांना सुचवायचे असेल तर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरी पंढरपुरला जाऊन कोरोना नष्ट कर, असे साकडे विठ्ठलाला का घातले, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला होता. येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भूमीपूजनचा सोहळा संपन्न होईल. 


अयोध्येत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही- संजय राऊत


शरद पवार काय म्हणाले होते?


करोनामुळं जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. या संकटात सापडलेल्या नागरिकांना कसं बाहेर काढायचं याबाबत आम्ही विचार करतोय. त्याला आम्ही प्रथम प्राधान्य देतोय. काहींना वाटतंय मंदिर बांधून करोना जाईल, म्हणून त्यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असावा, असे पवार यांनी म्हटले होते.