मुंबई : Share Market Crash : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारांमध्ये विक्रीचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आजही शेअर बाजारात सुरू होताच 1000 अंकांनी घसरला होता. निफ्टी निर्देशांक आपला सपोर्ट झोन तोडत 16300 अंकावर ट्रेड करीत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रशिया - युक्रेन युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. जगभरातील बाजारांमध्ये गुंतवणूकदारांनी घेतलेला सावध पवित्रा घेतला आहे. भारतीय बाजारात देखील याचा परिणाम स्पष्ट दिसून आला. आज बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स 1000 अंकांनी तर एनएसईचा निर्देशांक निफ्टी 200 हून अधिक अंकांनी घसरला आहे. 


सकाळी बाजार सुरू होताच निफ्टी 16300 तर सेन्सेक्स 54990 अंकावर ट्रेड करीत होते.  शुक्रवारी निम्मे तोटा भरुन काढल्यावर आज पुन्हा आशियाई बाजारात चिंतेचं वातावरण दिसून येत आहे.