Share Market मधून मोठी अपडेट; पाहा काय सांगतायेत आजची चिन्हं...
सेन्सेक्समध्ये 300 अंकांनी घसरण झाली आहे.
Share Market Falls Down: भारतीय शेअर बाजारात (Share Market Today) मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीचा रंग आज लाल होता. दोन्हीकडे त्यांचा बाण हा घसरलेला आहे. सेन्सेक्समध्ये 300 अंकांनी घसरण झाली आहे. तर निफ्टीही वेगानं खाली कोसळतो आहे. आजच्या बुधवारच्या व्यवहारात BSE 30 चा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) हा 164.36 अंकांनी म्हणजेच 0.27 टक्क्यांनी घसरून 61, 708.63 वर पोहचला आहे. तर NSE 50 चा निर्देशांक निफ्टी (Nifty) 5.15 अंकांवरून घसरून 18.398.25 वर पोहचला आहे. सध्या बाजार कोसळला असला तरी ऑटो, मीडिया, फार्मा, पीएसयू बँक निर्देशांकात सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसत आहे. मंगळवारी सेन्सेक्स 30 283 अंकांच्या वाढला होता आणि 61.907 वर बंद झाला होता. निफ्टी 74 अंकांच्या वाढीसह 18,403 वर बंद झाला होता. (share market falls down check the latest update of sensex and nifty)
पाच दिवसांपुर्वीच होती तेजी... पण आता?
5 दिवसांपुर्वी म्हणजेच 11 नोव्हेंबरला शेअर मार्केटमध्ये फार (Share Market Rises Today) मोठी उसळी पाहायला मिळाली होती. तेव्हा गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी निर्माण झालेली. जगातील मंदीच्यी पाश्वभुमीवर दिसणारा हा बदल प्रचंड सकारात्मक होता. परंतु आजच आलेल्या बातमीनुसार शेअर मार्केट चांगलंच कोसळलं आहे.
हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल
शेअर बाजारात (Share Market Latest News) मोठी उसळी पाहायला मिळाली. सध्या जगावर मंदीचं आणि महागाईचं (Global Recession 2023) वातावरण आहे. त्यामुळे हा बदल विशेष होता. सेन्सेक्स (Sensex) 1 हजार अंकांनी वधारला होता तर निफ्टी (Nifty) 286 अंकांनी वधारला होता. सध्या रूपया आणि डॉलर (Rupees Vs Dollar) यामध्येही एक वेगळीच झुंज पाहायला मिळाली होती.
डॉलरच्या तुलनेत रुपया 1.10 पैशांनी मजबूत झाला असून रुपया 80.71 प्रति डॉलरवर गेला होता. अमेरिकेतील महागाई दर (Inflation Rate) घटल्यानं बाजारात तेजी आल्याचं तज्ञांचं निरिक्षण होतं. या सकारात्मक बदलामुळे गुंतवणूकीचा आणि कमाईचा मोठा (earning opportunists in Share Market) मार्ग खुला झालेला पाहून सगळीकडेच आनंदाचे वातावरण होते.
हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा
कशात तेजी, कशात मंदी?
एफएमसीजी, धातू, रियल्टी, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू समभागांमध्ये घसरणीचे संकेत दिसत आहे. याशिवाय आयटी, पीएसयू बँक, फार्मा, प्रायव्हेट बँक, फार्मा आणि हेल्थकेअर इंडेक्स या क्षेत्रांमध्येही तेजीचा व्यवसाय दिसून येत आहे.