पालकांनो तुमची एक चूक...लहान मुलांकडे वेळीच लक्ष द्या, अन्यथा पुण्यातील 'या' घटनेची होईल पुनरावृत्ती

. या घटनेमुळे (Crime news) पुन्हा एकदा सगळीकडे खळबळ उडाली आहे. 

Updated: Nov 13, 2022, 05:23 PM IST
पालकांनो तुमची एक चूक...लहान मुलांकडे वेळीच लक्ष द्या, अन्यथा पुण्यातील 'या' घटनेची होईल पुनरावृत्ती title=

सागर आव्हाड, झी मीडिया: सध्या पालकांना आपल्या मुलांकडे (childrens) लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. कारण लहान मुलं नेहमीच कुठेतरी एकटीच फिरायला जातात, खेळायला जातात. जिथे पालकांचे लक्ष नसले तर मुलं हरवू शकतात आणि भरकटू शकतात. तेव्हा लहान मुलांची काळजी घेणं महत्त्वाचं ठरते. परंतु पुण्यात अशीच एक चूक पालकांच्या (Parents) अंगलट आली आहे आणि त्यांची त्यांचा 9 वर्षाचा लहान मुलगा या दुर्घटनेत गमावला आहे. या घटनेमुळे (Crime news) पुन्हा एकदा सगळीकडे खळबळ उडाली आहे. (a little boy fall under lift while playing parents scared pune news marathi)

सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या किरकटवाडी येथील भैरवनाथ नगर येथे काम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्टच्या डक्टमध्ये पडून तिसरीत शिकणाऱ्या चिमुकल्याचा (Pune News) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रथमेश गोपाळ कडावत (वय 9, रा. भैरवनाथ नगर, किरकटवाडी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. 

हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल

मोलमजुरी करुन जगत असलेल्या कुटुंबियांचा एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांच्या आक्रोशाने उपस्थित शेकडो नागरिक भावनिक झाले होते. प्रथमेश त्याच्या मित्रांसोबत पतंग उडवत होता. गवंडी काम करुन घरी आलेल्या आईवडिलांनी तो दिसेना म्हणून परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. 

हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा

परिसरातील इतर नागरिकही शोध घेत होते. रात्री सात वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने काम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्टच्या डक्टमध्ये पाहिले असता पाण्यात प्रथमेश दिसून आला. तातडीने याबाबत हवेली पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिपक गायकवाड घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळी पाहणी केल्यानंतर गायकवाड यांनी प्रथमेशचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पीएमआरडीएच्या नांदेड सिटी अग्निशमन दलाला पाचारण केले.