Share Market News | शेअर बाजारातील चढ - उतारामध्ये ब्रोकरेज फर्म्सने काही शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या कंपन्यांच्या शेअरमध्ये येत्या काळात दमदार तेजी येण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शेअर्सवर गुंतवणूकीचा सल्ला 
 
ICICI Direct यांनी आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेलच्या ( aditya birla fashion) शेअर्समध्ये खरेदी सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, कंपनीचा शेअर काही वेळात 350 रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. सध्या आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलच्या शेअरची किंमत 277 रुपये आहे.


आयसीआयसीआय डायरेक्टकडे कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज (Caplin Point Laboratories Ltd) आणि NMDC च्या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. ICICI डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने NMDC चा शेअरमध्ये गुंतवणूकीसाठी 135 रुपयांपर्यंतचे लक्ष्य दिले आहे. सध्या NMDC च्या शेअरची किंमत 113.25 रुपये आहे. 


कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीजवर गुंतवणूकीनंतर 1000 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. सध्या कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीजच्या स्टॉकची किंमत 814 रुपये आहे. आहे.


अॅक्सिस डायरेक्टने मणप्पुरम फायनान्सच्या (Manappuram Finance Ltd) शेअर्समध्ये तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे. अॅक्सिस डायरेक्टनुसार, मणप्पुरम फायनान्सच्या शेअरची किंमत 165 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. सध्या मणप्पुरम फायनान्सच्या शेअरची किंमत 107.20 रुपये आहे.


एचडीएफसी सिक्युरिटीजने गेल इंडियाच्या (GAIL (India) Limited) शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, गेल इंडियाच्या शेअरची किंमत 133.70 ते 180 पर्यंत जाऊ शकते.


अॅक्सिस डायरेक्टने मास फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक सुचवली आहे. ब्रोकरेज फर्मचा अंदाज आहे की मास फायनान्शियल सर्व्हिसेसचे (MAS Financial Services Ltd) शेअर्स 775 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. सध्या त्याच्या शेअरची किंमत 622 रुपये आहे.


मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने इंडिगो पेंट (Indigo Paints Ltd) आणि दालमिया भारत (Dalmia Bharat Ltd) शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. दालमिया भारतच्या शेअरसाठी 1815 रुपयांपर्यंत लक्ष्य देण्यात आले आहे. सध्या त्याची किंमत 1610 रुपये आहे.
  
मोतीलाला ओसवाल ब्रोकरेज फर्मने इंडिगो पेंट्सच्या शेअरच्या किमतीत तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे.  कंपनीचा शेअर 1800 पर्यंत पोहोचू शकतो. सध्या शेअरची किंमत 1540 रुपये आहे.