मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत देत नव्या आठवड्याची सुरुवात झालीय. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झालीय. दुसरीकडं गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेली पेट्रोल डिझेलची भाववाढ आजही सुरू आहे. तर डॉलरच्या तुलनेत आज पुन्हा एकदा रुपया घसरलाय. एका डॉलरसाठी आता ७२ रुपये ६० पैसे मोजावे लागणार आहेत.


बाजारात चढउतार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला होता. काही बँका आणि गृहनिर्माण कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यामुळे सेन्सेक्सने 1100 पेक्षा जास्त अंकांनी पडला होता. मार्केट बंद झाले त्यावेळी सेन्सेक्स 279.62 अंकांवह होता. त्यावेळी सेन्सेक्स 36841.60 अंकांवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी  91.25 अंकांनी घसरुन 11143.10 अंकांवर बंद झाला. तज्ञांच्या मते, क्रूड ऑइलच्या वाढत्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयातील कमजोरपणा आणि जागतिक शेअर बाजारातील घसरण यामुळे शेअर मार्केटमध्ये ही स्थिती पाहायला मिळत आहे.


यांचे शेअर्स तेजीत 


येस बँक, इंडियाबुल्स हाऊसिंग, यूपीएल, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, अदानी पोर्ट्स, सन फार्मा आणि टाटा स्टीलचे शेअर्स आज जोरदार आपटलेत. तर दुसरीकडे भारती इंफ्राटेल, आईओसी, एनटीपीसी, आईटीसी, बीपीसीएल, रिलायंस इंडस्ट्रीज, ओएनजीसी आणि आयसीआयसीआय यांचे शेअर्स तेजीत होते.