मुंबई : कोरोना महामारीनंतर देशावर आर्थिक संकट उभं राहीलं. आज अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्यानंतर पहिल्यांचा बजेट सादर केलं. सितारामण यांनी सादर केलेल्या बजेटमुळे शेअर बाजार वधारला आहे. सोमवारी दुपारी १२ वाजेनंतर सेंसेक्सने जवळपास 880 अंकांनी वधारला. त्यामुळे 47 हजार 170 अंकांवर बाजारात व्यवसाय काम करत आहे. तर दुसरीकडे निफ्टीत देखील मोठी वाढ झाली आहे. निफ्टीतही 237 अंकांनी वाढ झाली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी बजेट सादर होण्यापूर्वी बाजार सुरु झाला तेव्हा सेन्सेक्स ४४३ ने तर निफ्टी ११५ अकांनी वधारला होता. सितारामण यांचं बजेट सादर करून झाल्यानंतर सेंसेक्स 850.80 अंकांच्या वाढीसह 47,136.57 आणि निफ्टी 230.95 अंकांसह 3,865.55वर कारभार करत  आहेत. 



यापूर्वी शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात घसरण दिसून आली. त्या दिवशी सेन्सेक्स 588 पेक्षा जास्त अंकांनी खाली आला तर निफ्टी जवळपास 183 अंकांनी घसरला. पण आता बजेट सादर केल्यानंतर शेअर बाजारात उसळी आली आहे.