Share Market गुंतवणूकदार मालामाल! `या` शेअर्सनं 1 लाखांचे केले 3 कोटी
Share Market: भारतीय शेअर बाजारात हजारो कंपन्यांचे शेअर्स आहेत. लाखो गुंतवणूकदार आपलं डोकं लावून त्यात गुंतवणूक करतात. काही जण दीर्घ कालासाठी, तर काही जण इंट्रा डेच्या माध्यमातून शेअर बाजारात उलाढाल करतात. या शेअर बाजारात `राजा रंक आणि रंकाचे राजा` झाले आहेत.
Share Market: भारतीय शेअर बाजारात हजारो कंपन्यांचे शेअर्स आहेत. लाखो गुंतवणूकदार आपलं डोकं लावून त्यात गुंतवणूक करतात. काही जण दीर्घ कालासाठी, तर काही जण इंट्रा डेच्या माध्यमातून शेअर बाजारात उलाढाल करतात. या शेअर बाजारात 'राजा रंक आणि रंकाचे राजा' झाले आहेत. काही शेअरमधील गुंतवणूक भविष्याच्या दृष्टीकोनातून फायदेशीर ठरते. असाच एका शेअर्सने गुंतणूकदारांना कोट्यधीश केलं आहे. Aegis Logistics कंपनीचा हा शेअर आहे. या कंपनीचे शेअर्स घेतलेले गुंतवणूकदार आज कोट्यवधींमध्ये खेळत आहे. 1 जानेवारी 1999 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 0.60 रुपये इतकी होती. मात्र आता या कंपनीच्या शेअर्सची किंमत वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
गेल्या 23 वर्षात Aegis Logistics कंपनीच्या शेअर्सची किंमत 300 रुपयांच्या पार गेली आहे. 11 जून 2021 कंपनीच्या शेअर्सची क्लोजिंग किंमत 380.75 रुपये इतकी होती. तर गेल्या 22 आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची सर्वाधिक किंमत 308 रुपये आणि सर्वात कमी किंमत 167.25 रुपये इतकी होती. कंपनीच्या शेअर्सची किंमत 25 ऑक्टोबर 2022 रोजी 297.75 रुपये इतकी आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1999 किंवा 2000 मध्ये कंपनीचे शेअर्स 1 रुपये किमतीला विकत घेतले असतील, तर त्याला 1 लाख शेअर्ससाठी 1 लाख रुपये मोजावे लागले असतील. त्यामुळे आता त्या एक लाख शेअर्सची किंमत 3 कोटी रुपये झालीअसेल. अशा स्थितीत कंपनीचे शेअर्स खरेदी करणारे गुंतवणूकदार कोट्यधीश झाले असतील.
(Disclaimer: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. झी 24 तास कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)