नवी दिल्ली : RBI चे नवे गर्व्हनर म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. याआधी ते वित्‍त आयोगाचे सदस्य होते. शक्तिकांत दास माजी वित्‍त सचिव देखील आहेत. दोन वर्षापूर्वी झालेल्या नोटबंदीमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. वित्त सचिव अजय नारायण झा यांनी मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या गर्व्हनरांची घोषणा केली. रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं म्हटलं होतं. 1990 नंतर ते पहिले असे गर्व्हनर आहेत ज्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


26 फेब्रुवारी 1957 ला शक्तिकांत दास यांचा जन्म झाला. इतिहासात एमए आणि तमिळनाडू कॅडरमध्ये आयएएस अधिकारी झाले. रिटायरमेंटनंतर त्यांनी भारताच्या 15 व्या वित्त आयोग आणि G -20 मध्ये भारतचे शेरपा होते. भारताचे आर्थिक प्रकरणाचे सचिव, भारताचे राजस्व सचिव आणि भारताचे उर्वरक सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे.


केंद्रीय आर्थिक प्रकरणाचे सचिव असताना शक्तिकांत दास भारताचे सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीत होते. आर्थिक प्रकरणाचे माजी सचिव शक्तिकांत दास यांना मागच्या वर्षी जी-20 मध्ये शेरपा म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत G-20 शिखर संमेलनात देखील त्यांनी भाग घेतला होता.