नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे. कृषी विधेयकांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये फूट पडली आहे. शेतकरी प्रश्नावर आणि कृषी विधेयकावरुन भाजपचा घटक पक्ष शिरोमणी अकाली दलाने रामराम केला आहे. भाजप प्रणित एनडीएचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जुना सहकारी शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कृषी विधेयकावरून शिरोमणी अकाली दल आणि केंद्र सरकारमध्ये ठिणगी पड़ली होती, केंद्र सरकारने कृषी विधेयक , किमान हमी भावासंदर्भातील धोरणावर भूमिका न बदलल्याने शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.


नव्या कृषी धोरण जाहीर झाल्यानंतरच अन्नप्रक्रीया मंत्रीपदावरून हरसिम्रत कौर यांनी मागच्याच आठवड्यात राजीनामा दिला होता. आता  शिरोमणी अकाली दल एनडीएतून वेगळे झाले आहेत. अकाली दलने लोकसभा आणि राज्यसभेत या विधेयकांचा विरोध केला होता. भाजप आणि अकाली दल मागील २२ वर्षांपासून सोबत आहेत.