इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मराठी माणसाची तशी कमी नाही. येथील मराठी माणसांनी आज मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली, त्याचा व्हीडीओ समोर आला आहे. मुंबई गुढीपाडव्याला महिला वर्गात असतो, तसा उत्साह महिलांमध्ये आणि युवक युवतींमध्ये दिसून आला आहे. इंदूरमधील राहू उपनगरमध्ये मराठी माणसांची संख्या अधिक आहे, आपल्या राजाच्या जयंतीसाठी त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. यावेळी मिरवणुकीत शोभा यात्राही काढण्यात आली. (shiv jayanti celebration in indore by marathi people) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मंगलवाद्यांच्या आवाजात युवक-युवतींमध्ये असा उत्साह फार कमी ठिकाणी दिसून येतो. मराठा साम्राज्याचा विस्तार होत असताना, मराठ्यांनी उत्तरेत दिल्लीच्या दिशेने अनेक मोहिम काढल्या, त्यावेळी अनेक मराठी बांधव या पट्ट्यात स्थाईक झाले.