मुंबई : आम्ही निर्णयाच्या जवळ आलो आहोत, अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपा सरकारविरोधात राज्य आणि देशभरात नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे एक बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार आणि नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर खा. संजय राऊत यांनी ही प्रतिक्रीया दिली. 


प्रश्न प्रलंबितच


भाजप सरकारच्या काळात महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णयही सरकारनं लटकत ठेवला आहे. या सर्व परिस्थितीमुळे जनतेत भाजप सरकारविरोधात प्रचंड नाराजी असल्याचे सूर या बैठकीत पाहायला मिळाला. 


अंतिम निर्णय पक्षप्रमुखांचा


शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि नेत्यांनी सत्तेत राहावं की नाही या संदर्भातले आपले मत मांडले.  आम्ही निर्णयाच्या जवळ आलो आहोत, अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.


'आमची कामं होत नाहीत'


भाजपच्या आमदार, खासदारांची कामं होतात. मात्र शिवसेनेच्या आमदारांची कामं होत नाहीत, अशी तक्रार यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.