नवी दिल्ली  : काँग्रेस नेत्यासोबत ‘कॉफी पे चर्चा’ केल्यामुळे नाराज एकनाथ खडसे काँग्रेसच्या वाटेवर आहेत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्याचवेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. मला शिवसेनेकडून ऑफर आली होती. पण मी ती धुडकावली, असे खडसे म्हणालेत.


एकनाथ खडसे म्हणाले,


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- काँग्रेस सोबतची माहिती निराधार आहे
- चिंतामण वनगा यांचे निधन झाले. त्यामुळे औरंगाबाद हून दिल्लीला निघालो होतो.
- त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण, मोहन प्रकाश भेटले. त्यांच्या सोबत काॅफी घेतली 
- राजकीय चर्चा कोणतीच झाली नाही
- हे खरं आहे की, नाथाभाऊंना सर्वाना हवाहवासा वाटतोय


शिवसेनेबाबत खडसेंची भूमिका


- शिवसेनेचे माझ्यावरचे प्रेम फार जुने आहे
- युती तोडली तेंव्हा शिवसेनेला वाटले मी जबाबदार आहे
- शिवसेनेने मला पक्षात येण्याची ऑफर दिली होती
- पण मी ऑफर घेतली नाही
- त्याचाच राग धरून शिवसेना माझ्यावर टीका करतेय
- शिवसेना नेते राजीनामे कधी देतात याची वाट पाहतोय
- शिवसनेने दुटप्पी धोरण सोडावे.


खडसेंची भाजप भूमिका


- आरोप केल्यावर मी राजीनामा दिला
- जेवढे आरोप झाले त्यात तथ्य नाही
- तथ्य काय आहे ते एकदा स्पष्ट सांगा
- अजूनही तपास सुरू असेल तर योग्य नाही
- मी दोषी असेल तर शासन झालं पाहीजे
- मी सध्या भाजप मध्ये आहे. चूक केल्याचे सिद्ध झाले तर जेलमध्ये दिसेन.