लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका
शिवसेनेच्या १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवल्यानंतर शिवसेना नेमकी कोणाची हा वाद आणखीनच पेटला आहे.
Shivena petition in SC : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknat shinde) गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या गटात संघर्ष वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवल्यानंतर शिवसेना नेमकी कोणाची हा वाद आणखीनच पेटला आहे.
अशातच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात (supreme court) याचिका दाखल केली आहे. शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी विनायक राऊत यांच्या ऐवजी राहुल शेवाळेंच्या नियुक्तीला मान्यता देण्याच्या लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा आणखी एक सामना सर्वोच्च न्यायालयात पाहायला मिळणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर 40 आमदारांपाठोपाठ 12 खासदारांनीही शिवसेना मोठा धक्का दिला होता. शिवसेनेचे 12 खासदार देखील शिंदे गटात सहभागी झाले. यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही एक धक्का शिवसेनेला दिला होता. शिंदे समर्थक खासदारांनी लोकसभेतील शिवसेनेचा गटनेता बदलण्याची केलेली मागणी मान्य करत राहुल शेवाळे यांना गटनेता म्हणून मान्यता दिली होती. राहुल शेवाळे यांच्या नियुक्तीचा लोकसभा अध्यक्षांचा हा निर्णय शिवसेनेच्या बंडखोर खासदारांच्या गटासाठी मोठा दिलासा देणारा होता.
याउलट आता उरलेल्या शिवसेना खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. या बंडाआधी लोकसभेच्या पक्षाच्या गटनेतेपदाची जवाबदारी खासदाक विनायक राऊत यांच्यावर होती. मात्र १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्यानंतर लोकसभा अध्यक्षांकडे गटनेता बदलण्याची मागणी केली होती.