ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग?... शेवटच्या सर्व्हेत काय काय सापडलं?
वाराणसीच्या ( varanasi) ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi Mosque) सर्वे पूर्ण झाला आहे. हा सर्वे सलग तीन दिवस सुरु होता. या सर्वेतून काही महत्त्वाचं निरीक्षण समोर आल्याचे समजत आहे
वाराणसी: वाराणसीच्या ( varanasi) ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi Mosque) सर्वे पूर्ण झाला आहे. हा सर्वे सलग तीन दिवस सुरु होता. या सर्वेतून काही महत्त्वाचं निरीक्षण समोर आल्याचे समजत आहे. सोमवारी सर्वे करणाऱ्या टीमने नंदीसमोरच्या विहिरीतचं सर्वेक्षण केलं. या सर्व्हेत विहिरीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे. हा दावा हिंदू पक्षाच्या वकिलांनी केला आहे. या शिवलिंगाच्या (Shivling) सुरक्षेसाठी हिंदू पक्ष कोर्टात जाणार असल्याचं कळतंय. हे सर्वेक्षण चोख सुरक्षा व्यवस्थेत पार पडलं. इतकंच नव्हे तर सर्वेक्षणादरम्यान तब्बल दोन किलोमीटरचा परिसर बंद करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणावर या परिसरात फौज तैनात करण्यात आली होती.
रविवारी कुठे झालं होतं सर्वेक्षण ?
ज्ञानवापी मशिदीत सलग तीन दिवस सर्वेक्षण सुरु होतं. या दरम्यान भिंतीवरचा चुना काढून सर्वेक्षण करण्यात आलं. दरम्यान रविवारी मशिदीचा पश्चिम दरवाजा, नमाज पठण करण्याची जागा, वजू करण्याची जागा तसंच मशिदीच्या तळघाराचं देखील सर्वेक्षण करण्यात आलं.
चोख सुरक्षा व्यवस्था
सर्वेक्षणाच्या दरम्यान चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. गोदौलिया ते मैदागिनपर्यंत सगळी दुकानं बंद करण्यात आली होती. त्याच बरोबर दोन किलोमीटरच्या परिसराला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. कालच्या तुलनेत आज जास्त फौजफाटा तैनात करण्यात आला होता. परिसरात युपी पोलीस आणि सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते.
मुस्लिम पक्षाने फेटाळला हिंदू पक्षाचा दावा
सोमवारी हिंदू पक्षाच्या वतीने दावा करण्यात आला आहे की, मशिदीच्या विहिरीत शिवलिंग सापडलं. मात्र हा दावा मुस्लिम पक्षाने फेटाळून लावला आहे. विहिरीत शिवलिंग सापडलं नसल्याचं मुस्लिम पक्षाचं म्हणणं आहे.
कोर्टात सादर होणार अहवाल
कोर्टाने नियुक्त केलेल्या टीमद्वारे सलग तीन दिवस सर्वेक्षण करण्यात आलं. सर्वेक्षणाअंतर्गत एक रिपोर्ट 17 मे रोजी कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने कोर्टात रिपोर्ट सादर होणार आहे.