VIDEO : शिवपुरीमध्ये एकाचवेळी 10जण गेली वाहून
सेल्फीमुळे गमावला का जीव?
मुंबई : मध्यप्रदेश शिवपुरी आणि ग्वालियर जिल्हा प्रशासन वेळेत पोहोचले असते तर आज 12 लोकांचे प्राण वाचले असते. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनिमित्त धबधब्यावर फिरायला गेलेल्या 10 लोकं वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेत 20 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तसेच आणखी 34 लोकं त्या ठिकाणी अडकल्यामुळे त्यांना हेलिकॉप्टर पाठवण्यात आले होते.
प्रशासनाला 3 तास अगोदर माहिती मिळूनही बचाव कार्य उशिरा झालं. धबधब्याचा प्रवाह जास्त असल्याने पाण्यात जाऊ नका असा इशारा आधीच या मुलांना दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या सूचनेकडे कानाडोळा केल्यामुळे 10 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याप्रमाणे दगडांवर अडकलेल्या एका तरूणाने फोन करून आपण जिथे आहोत तिथे पाण्याचा प्रवाह वाढल्याचं सांगितलं. त्यांचा जीव धोक्यात असल्याचं देखील तो म्हणाला. मोठा दोरखंड टाकून मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यामध्ये 10 लोकांना वाचवण्यात यश आलं नाही