कोलकाता : पश्चिम बंगालच्या आसनसोलचे शिवसेना पक्षाचे उमेदवार अभिषेक कुमार सिंह यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने अभिषेक कुमार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी आपल्या समर्थकांसह वाद्यांच्या गजरात, भोजपुरी गाण्याच्या ठेक्यावर ताल धरत त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं. त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अभिषेक कुमार सिंह यांना भाजप पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या १९ बंडखोरांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. बाबुल सुप्रियो यांची उमेदवारी भाजपने परत घेतली तर शिवसेना तर ते देखील उमेदवारी मागे घेतील असं पश्चिम बंगालमधील शिवसेना नेत्यांनी म्हटलं आहे. शिवसेना हा एनडीएचा भाग आहे. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना एकत्र लढत आहे. पण बंगालमध्ये मात्र काही वेगळं चित्र आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप वाढत असताना शिवसेनेने देखील तेथे उमेदवार दिले आहेत.


भाजपचा मतदार हाच शिवसेनेचा मतदार आहे हे देखील त्यांना माहित आहे. भाजप पश्चिम बंगालमध्ये शिवसेनेला फार महत्त्व देताना दिसत नाही आहे. त्यामुळे आता वरिष्ठ यावर काय निर्णय घेतील हे अजून समोर आलेलं नाही.