`भाजपला साडे सहाशे शहिदांच्या रक्तपाताचा जाब द्यावा लागेल`
भाजपचा सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय
मुंबई : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपनं मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीचा पाठिंबा काढला आहे. भाजपनं पाठिंबा काढल्यामुळे जम्मू-काश्मीरमधलं सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. ही युती राष्ट्रविरोधी आणि अनैसर्गिक होती. ही युती टिकणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणले होते, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. भाजप-पीडीपीची युती कायम राहिली असती तर 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर द्यावं लागलं असतं, असं संजय राऊत म्हणाले. गेल्या तीन वर्षात साडे सहाशे जवान शहीद झाले या रक्तपाताचा जाब भाजपला द्यावा लागेल, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलीय.