Girl Digitally Raped in Ghaziabad: गेल्या अनेक दिवसांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच एक डिजिटल बलात्काराची घटना समोर आली आहे. सध्या जग डिजिटलकडे वळत आहे अशात डिजिटल बलात्कार ही नवीन सकंल्पना समोर आली आहे. अशीच एक घटना कानवानी गावातील शेजारी राहणाऱ्या एका विवाहितेने पाच वर्षांच्या मुलीवर डिजिटल बलात्कार केला. इंदिरापुरम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली.


हे ही वाचा - अजून एका Star Kid ची संपत्ती आली समोर... ऐकून तुम्हीही व्हाल थक्क...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची आई कामावर गेली असताना आरोपीने ही घटना घडवली. एसपी सिटी-2 ज्ञानेंद्र कुमार यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. (Shocking A case of digital rape of a 5 year old girl nz)


हे ही वाचा - हवेत तरंगणारे शहर कधी पाहिलंय का? पहिली झलक आली समोर 



घटनेच्या वेळी मुलीच्या घरी कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध इंदिरापुरम पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेनंतर आरोपी फरार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल.


हे ही वाचा - तुम्हाला फिरायला जायचं आहे का? IRCTC च्या खास पॅकेजबाबत जाणून घ्या



ही  घटना दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील आहे. यापूर्वी जूनमध्ये नोएडामध्येही डिजिटल बलात्काराची घटना समोर आली होती. नोएडातील एका प्ले स्कूलमध्ये तीन वर्षांच्या मुलीवर डिजिटल बलात्कार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटकही केली होती.