Ananya Panday Birthday : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अनन्या पांडे ही आपल्या अभिनयासह क्यूटनेससाठी (Ananya Pandey Cute Photo) ओळखली जाते. अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करण जोहरने तिला बॉलिवूमध्ये लॉन्च केले. अनन्या अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. तिला अभिनयाचा वारसा तिच्या वडिलांकडून मिळाला आहे. तिनं फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची जागा तयार केली. अनन्या पांडे (Ananya Pandey) आज 30 ऑक्टोबर (Ananya Pandey Birth Date) रोजी तिचा 24 वा वाढदिवस साजरा करत आहे. कमी वयातच चर्चेत येणाऱ्या कलाकारांमध्ये आता अनन्याचंही नाव पुढे येत आहे. अनन्या पांडेची गणना बॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेत्रींमध्ये केली जाते. आज अनन्याच्या वाढदिवसानिमित्त या अभिनेत्रीच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.
अनन्या पांडे तिच्या चित्रपट आणि जाहिरातींमधून चांगलीच कमाई करते. अनन्या तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी दोन कोटींची मोठी रक्कम घेते. यासोबतच ती जाहिरातीसाठी लाखो रुपये घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडेची एकूण संपत्ती 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. (Ananya Panday earned crores as soon as she made her debut in bollywood nz)
अनन्या पांडेचे स्वतःचे आलिशान घर आहे. मुंबईतील पाली हिल येथील एका घरात ती कुटुंबासह राहते. त्यांनी आपल्या घरात आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश केला आहे. त्यांच्या घराची किंमत करोडोंमध्ये असल्याचे सांगितले जाते.
अनन्या पांडेला लक्झरी कारचीही खूप आवड आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या कार कलेक्शनमध्ये 88.24 लाख रुपयांची 'रेंज रोव्हर स्पोर्ट', 63.30 लाख रुपयांची 'मर्सिडीज-बेंझ ई-क्लास', 33 लाख रुपयांची 'स्कोडा कोडियाक' आणि 'सारख्या महागड्या कारचा समावेश आहे. Hyundai Santa Fe'ची किंमत 30 लाख रुपये आहे.
अभिनेत्री अनन्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनन्या पांडे तिचा बराचसा वेळ इन्स्टाग्रामवर घालवते. ती तिच्या चाहत्यांसाठी रोज नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अनन्याचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. अनन्या पांडेचे इन्स्टाग्रामवर 24 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिनं शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल असतात. कधी कधी ती तिच्या त्या पोस्टमुळे अडचणीत ही येते.