नवी दिल्ली : आधार कार्डधारकांची वैयक्तिक माहिती पूर्ण सुरक्षित असल्याचं सरकारकडून सांगितलं जात होतं. मात्र सुमारे दोनशेहून अधिक सरकारी संकेतस्थळांवरुच आधार कार्डधारकांची माहिती लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


हा प्रकार नेमका कधी घडला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांमार्फत मागवण्यात आलेल्या माहितीला उत्तर देताना यूआयडीएआयने ही माहिती दिली आहे. या घटनेमुळे आधार कार्डमधील माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा प्रकार नेमका कधी घडला याची माहिती देण्यात आलेली नाही. 


चूक आपल्याकडून घडली नाही- यूएडीआय


मात्र ही चूक आपल्याकडून घडली नसल्याचं यूएडीआयने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, माहितीच्या अधिकारांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीला उत्तर देतना यूएडीएआयने म्हटले आहे की केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतिल सुमारे 200 संकेतस्थळांनी आधार कार्डधारकांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केली आहे.


संकेतस्थळांना ही माहिती काढण्याचे आदेश


उघड झालेल्या माहितीमध्ये कार्डधारकांचं नाव, पत्ता आणि इतर माहितीचा समावेश आहे. हा प्रकार लक्षात येताच यूआयएडीआयने संबंधित संकेतस्थळांना ही माहिती काढण्याचे आदेश दिल्याचेही यूआडीएआयने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.