प्री वेडिंग शूटमध्ये मोठा अनर्थ; नदीवर असं काही घडलं की.., धक्कादायक Video समोर!
Viral Video of Couple : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्री-वेडिंग शूटदरम्यान एका जोडप्याला भीषण अपघात झाला होता. त्यानंतर असं काही झालं की...
Pre Wedding Shoot Video : हल्ली लग्न धुमधडाक्यात करण्याची क्रेझ खूप वाढल्याचं पहायला मिळतंय. लग्नाबाबत प्रत्येक जोडप्याची काही ना काही स्वप्ने असता... इच्छा असतात. सध्याच्या काळात प्री वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) हे सर्रास पहायला मिळतंय. त्यासाठी आता नवनवीन डेकोरेटेड ठिकाणं देखील एकप्रकारे व्यवसायात्म झाली आहेत. त्यामुळे प्री वेडिंगचं फ्याड आजच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसून येतंय. अशातच आता प्री वेडिंग शूटचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्री-वेडिंग शूटदरम्यान एका जोडप्याला भीषण अपघात झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे प्री-वेडिंग शूटसाठी नदीत उतरताना दिसतंय. त्यांना पाण्यात फोटोग्राफी करायची असल्याने पहिला मुलगा पाण्यात जातो. यानंतर, गाऊन परिधान करून मुलगी पाण्यात उतरण्याची तयारी करत असते. त्यावेळी न काही विचार करता मुलीने पाण्यात उडी मारली. त्यानंतर जे काही झालं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
मुलीने उडी मारताच ती थेट खोल पाण्यासाठी गेली, तर तिचा गाऊन पाण्याच्या खाली जाऊ शकला नाही. त्यामुळे गाऊन पाण्यावर तरंगला. मुलगा मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करतो. तिला वर घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याच्या हाती लागलं ते फक्त प्री वेडिंगचा गाऊन. त्यानंतर मुलगा आसपास मुलीचा शोध घेतो. मात्र मुलगी कुठेच सापडत नाही. त्यानंतर मुलगी एका दुसऱ्या बाजूने बाहेर येते. त्यावेळी भीतीने शाब्दुक झालेली मुलगी मुलाकडे जाण्याचा प्रयत्न करते. मुलगी वर आल्याचं पाहून मुलाच्या जीवात जीव येतो.
पाहा Video
दरम्यान, आसपासच्या लोक देखील मुलीला वाचवण्यासाठी नदीत उडी घेताना दिसत आहेत. सर्वांनी मिळून मुलीला बाहेर काढलं. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर हास्यद मत मांडलं आहे. मात्र, एखाद्या ठिकाणी अशी जोखीम पत्करणं धोक्याचं ठरू शकतं. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ जवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने शुट केला आहे.