नवी दिल्ली : कोरोना इबोला सोबत आता भारताचं टेन्शन आणखी वाढणार आहे. याचं कारण म्हणजे भारतात मंकीपॉक्सचा दुसरा संशयित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुबईहून केरळमध्ये आलेल्याला मंकीपॉक्सची लक्षणं आढळून आली आहेत. मागील 4 दिवसात 2 रुग्ण आढळल्याने आता खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून येणा-या प्रवाशांवर केंद्राची नजर असून, विमानतळ, बंदरांवर परदेशी प्रवाशांची स्क्रिनिंग केलं जात आहे. 


केरळमधल्या कोल्लम इथे मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला होता. हा तरुण युएईमधून आल्याची माहिती मिळाली होती. आता दुसरा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. 



काय आहेत मंकीपॉक्सची लक्षणं?
मंकीपॉक्सची प्रामुख्याने ताप, डोकेदुखी, शरीरावर फोड्या येणं अशी प्रमुख लक्षणं आहेत. मंकीपॉक्स हा विषाणू आहे. जो पहिल्यांदा माकडांमध्ये सापडला होता. यानंतर 1970 मध्ये एका व्यक्तीमध्ये या विषाणूची लक्षणं दिसली असती. याचा पहिला रुग्ण आफ्रिकेत सापडला होता.


मंकीपॉक्स संसर्गाची लक्षणे साधारणपणे 6 ते 13 दिवसापासून ते 5 ते 21 दिवसांपर्यंत ते असू शकतात. ताप, तीव्र डोकेदुखी, सुजलेल्या लिम्फ नोड्स, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि अशक्तपणा यासारखी लक्षणं यामध्ये आढळतात. अंगावर पुरळ येऊन त्याचं प्रमाण वाढतं. साधारण कांजण्यांसारखा दिसणारा पण त्यापेक्षा भयानक असलेला हा विषाणू आहे.