Shocking! राखी बांधलेल्या भावानेच केली बहिणीची हत्या
राखी बांधलेल्या भावानेच बहिणीची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नवी दिल्ली : राखी बांधलेल्या भावानेच बहिणीची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
खड्ड्यात पुरला मृतदेह
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाऊ आणि वडिलांनी परिवाराची शान आणि अब्रुच्या नावावर सर्वांसमोर तरुणीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली. इतकचं नाही तर, बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर भानवाने तिचा मृतदेह खड्डा खोदून त्यात पुरून ठेवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपांजली नावाच्या तरुणीचं एका तरुणासोबत प्रेम होतं. परिवारातील सदस्यांनी दीपांजलीला त्या तरुणापासून दूर राहण्याचा तसेच त्याच्यासोबत न बोलण्याचा सल्ला दिला. मात्र, दीपांजलीने याकडे दुर्लक्ष केलं आणि प्रियकरासोबत भेटणं सुरुचं ठेवलं.
वडील आणि भावानेच केली हत्या
दीपांजली ऐकत नसल्याने संतापलेल्या वडिलांनी आणि भावाने तिची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपांजली आपल्या प्रियकरासोबत घरातून पळून गेली होती. यानंतर तिच्या नातेवाईकांनी खूप शोधलं पण तिचा कुठेही शोध लागला नाही. मग तिच्या नातेवाईकांनी गावातीलच चार व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानंतर १९ दिवसांनी दीपांजलीला पोलिसांनी शोधलं आणि घरी सोपवलं. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा दीपांजली घरातून गायब झाल्याचं वृत्त पोलिसांना मिळालं.
परिवारातील सदस्यांवर संशय
दीपांजली पुन्हा घरातून पळून गेल्यानंतर पोलिसांना घरच्यांचा संशय आला. त्यानंतर पोलिसांनी दीपांजलीच्या घरच्यांची चौकशी केली. पोलिसांच्या दबावानंतर दीपांजलीच्या भावाने जे सांगितलं ते ऐकल्यावर सर्वांनाच धक्का बसला.
भावाने गुन्हा कबूल केला
दीपांजली घरातून पळून गेल्यानंतर सर्वांनाच अपमान झाल्यासारखं वाटत होतं त्यानंतर ती पुन्हा घरी आली तेव्हा तिला मारण्याचा कट रचला अशी माहिती तिच्या भावाने दिली. दीपांजलीला मी आणि वडिलांनी मिळून गोळी मारली. त्यानंतर गावाबाहेर एक खड्डा खोदून त्यात तिचा मृतदेह पुरला असा कबुलीजबाब तिच्या भावाने दिला आहे.