Shraddha Murder Case: अवघ्या देशाला हादरावून सोडणाऱ्या दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणाची (Shraddha Murder Case) नव नवीन खुलासे समोर आले आहेत. आरोपी आफताबने श्रद्धाची हत्या करून तिचा मोबाइल हा महाराष्ट्रात फेकून दिला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहे. तसेच श्रद्धा वालकरचा (Shraddha Walker) खून सहा महिन्यांपूर्वी मे महिन्यात झाला, असा पोलिसांचा दावा आहे. तर तिचा मित्र लक्ष्मण नाडार (Laxman Nadar) याने आपले जुलैमध्ये श्रद्धाशी संभाषण झाले होते, असे म्हटले आहे. त्यामुळे श्रद्धाचा खून नेमका कधी झाला असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.  त्यानंतर आता श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार समोर आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृतदेहाचे 35 तुकडे फ्रीजमध्ये


दिल्लीत 14 नोव्हेंबरला मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. विकृत प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. गेल्या सहा महिन्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, अखेर पोलिसांनी या विकृती प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. परंतु या विकृत प्रियकराच्या बाबतीत दुसरी एक धक्कादायक माहितीसमोर आली आहे.   


आफताबच्या हातावर  5 ते 6 टाके घालण्यात आले


श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबच्या (Aftab) हातावर  5 ते 6 टाके घालण्यात आले होते. टाके घालणाऱ्या या डॉक्टरला पोलिसांनी आता साक्षीदार बनवलंय. आफताबच्या घरात शोध घेत असताना पोलिसांना डॉक्टरची चिठ्ठी सापडली होती. त्यावरुन पोलीस या डॉक्टरपर्यंत पोहोचले. पोलिसांनी डॉक्टरचा जबाब नोंदवला असून तो मुख्य साक्षीदार मानला जातोय. दरम्यान आफताबनं श्रद्धाची हत्या पूर्णपणे प्लॅन करुनच केल्याचा संशय पोलिसांना वाटतोय. आफताब चौकशीतही उलटसुलट उत्तरं देतोय. त्यामुळे आफताबची नार्को टेस्ट करण्याच्या मागणीसाठी पोलिसांनी कोर्टात धाव घेतलीय. 


वाचा : लव्ह, लिव्ह इन आणि लव्ह जिहाद ? धर्मांतराच्या वादातून श्रद्धाची हत्या? 


श्रद्धाच्या मृतदेहाचे  12 तुकडे सापडले 


श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधता यावेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबला मंगळवारी मेहरौलीच्या जंगलात नेले होते. पोलिसांना आतापर्यंत १२ तुकडे मिळाले आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतरच हे तुकडे श्रद्धाचे आहेत, की नाही याची पुष्टी होईल. गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही जप्त केला आहे.