Covid Vaccine Side Effects: कोरोनामहामारीमुळे संपूर्ण जग चिंतेत होते. कोरोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनो महामारीशी लढण्यासाठी विकसीत करण्यात आलल्या लसीमुळे दिलासा मिळाला. कोरोनापासून बचावर करण्यासाठी लाखो लोकांनी कोरोनालसीकरण करुन घेतले. मात्र, आता जवपास 3 वर्षानंतर कोरोना लसीबाबत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. कोव्हिशिल्डनंतर आता कोवॅक्सिन (covaxin) या लसीचे साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील काही दिवसांपासून  कोव्हिशिल्ड लस चर्चेत आहे.  कोव्हिशिल्ड लसीचे दुष्परिणाम समोर आले. AstraZeneca कंपनीच्या  कोविशील्ड आणि वॅक्सजेव्हरिया या कोरोना लसी बाजारात उपलब्ध आहेत. जगभरात लाखो लोकांनी या लसी घेतल्या आहेत. मात्र, या लसीचे दुष्परिणाम होत असल्याचा दावा करत ब्रिटनमध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने AstraZeneca कंपनीविरोधात कोर्टात केस दाखल केली. ॲस्ट्राझेनेकाची लस दिल्यानंतर मेंदूला हानी पोहोचल्याच या व्यक्तीने कोर्टात नमूद केलेल्या याचिकेत म्हंटले आहे. या व्यक्तीसह अनेकांनी या लसीचे  दुष्परिणाम झाल्याची तक्रार  केली आहे. यूके उच्च न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला.  


कोव्हिशिल्डमुळे हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक येण्याची भिती


AstraZeneca कंपनीने या लसीचे काही प्रमाणात दुष्परिणाम होत असल्याची कबूली कायदेशीर प्रकरणात दिली आहे. अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्यांच्या लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) होऊ शकतो. यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो असा खुलासा कंपनीने केला आहे.


कोवॅक्सिनचे नेमके काय साइड इफेक्ट्स होणार


कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर आले आहेत. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचे होणारे दुष्परिणाम संशोधकांनी शोधून काढले आहेत. या संदर्भातील अहवाल स्प्रिंगरलिंकवर प्रकाशित करण्यात आला आहे. महिला आणि किशोरवयीन मुलांमध्ये या लशीच्या दुष्परिणामांबाबत सर्वेक्षण करण्यात आले. 1,024 लोकांचा या सर्वेक्षमात समावेश करण्यात आला होता. लस घेतलेल्या 635 किशोरवयीन आणि 291 प्रौढ व्यक्तींना प्रकृतीची माहिती या सर्वेक्षणात घेण्यात आली. कोवॅक्सिन लस घेतलेल्यांना AESI या दुर्मिळ प्रकारच्या एलर्जीसारखी लक्षणं जाणवली आहेत. 


AESI म्हणजे नेमकं काय?


या व्हॅक्सीनमुळे AESI गटातील आजार होण्याचा धोका असतो. AESI याला इंग्रजीत अॅडव्हर्स इव्हेंट ऑफ स्पेशल इंटरेस्ट असे म्हटले जाते. कुठलेही आजार टाळण्यासाठी एखादे व्हॅक्सीन घेतल्यास आपल्या शरीरात आधीच असलेली रोगप्रतिकारक क्षमता सक्रीय होते. अशात रोगप्रतिकारक क्षमता आणि व्हॅक्सीनच्या इफेक्ट्समुळे शरीरात जे बदल घडून येतात, त्यातून काही अनपेक्षित सुद्धा घडू शकतं. त्यालाच AESI असे म्हटले जाते. कोव्हीशील्ड व्हॅक्सीन घेतल्यानंतर मोजक्या लोकांना TTS (थ्रॉम्बोटिक थ्रॉम्बोसायटो पेरिया) हा आजार झाल्याचे निदर्शनास आले. हा आजार AESI चाच एक भाग आहे.