प्रवासादरम्यान फोन वापरत असाल, तर सावधान... या तरुणासोबत काय घडलं? पाहा व्हिडीओ
सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका वापरकर्त्याने ट्विटरवर व्हिडीओची स्लो मोशन आवृत्ती पोस्ट केली आहे.
मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपल्याला कधी आश्चर्यचकीत करतात, तर कधी आपलं मनोरंजन करतात. तर काही सोशल मीडियावरील व्हिडीओ हे आपल्यासाठी उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ही सवय असते की, ते आपल्या फोनमध्ये आपल्या प्रवासातील किंवा आजूबाजूचे काही क्षण टीपतात. परंतु असं करणं एका तरुणाला भलतंच महागात पडलं आहे.
बिहारच्या बेगुसरायमध्ये फोन चोरून नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. पाटणा आणि बेगुसरायला जोडणाऱ्या राजेंद्र सेतू रेल्वे पुलावर ही संपूर्ण घटना घडली आहे.
सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका वापरकर्त्याने ट्विटरवर व्हिडीओची स्लो मोशन आवृत्ती पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तुम्ही नेमकं काय आणि कसं घडलं हे पाहू शकता.
खरंतर ट्रेनच्या दरवाजाजवळ उभा असलेला एक तरुण आपल्या फोनच्या कॅमेरात आपल्या प्रवास कैद करत होता. ट्रेन जेव्हा या समुद्र सेतूवरुन जात होती, तेव्ही ते दृश्य खूप सुंदर दिसत होतं, हे दृश्य आपल्या फोनमध्ये कैद करण्याचा मोह त्या व्यक्तीला आवरला नाही आणि त्याने आपल्या फोनमध्ये ते कैद करण्याचे ठरवले.
परंतु त्यावेळेला त्याच्यासोबत एक घटना घडली, ज्यामध्ये या तरुणाचा फोन चोरीला गेला. खरंतर हे सगळं इतकं फास्ट आणि कमी वेळात झालं की, आपल्यासोबत नक्की काय घडलं आणि आपल्या फोन नक्की गेला कुठे? हे या तरुणाला देखील कळलं नाही.
परंतु तुम्ही जेव्हा या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओला स्लोमोशनमध्ये पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, कसं या तरुणाच्या हातातील मोबाईल एक व्यक्ती हिस्कावून घेतो.
राजेंद्र सेतू पुलावर घडलेली हे एकमेव घटना नाही. पुलावरुन असे अनेक दरोडेखोर लटकले आहेत. ते पुलावर लटकण्यासाठी दोरीचा वापर करतात आणि काठावर पाय ठेवून ट्रेनपासून सुरक्षित अंतर ठेवतात.
हा जुना व्हिडीओ आतापर्यंत १३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. लोक या व्हिडीओला आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करत आहे.