मुंबई : उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी इनकम टॅक्स विभागान धाडसत्र सुरु केलं आहे. यामध्ये व्यावसायिक पीयुष जैन आणि पुष्पराज जैन यांच्यामागोमाग आता आयपीएस राम नारायण सिंह यांच्या घरीही धाड टाकण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोएडा पूर्व येथे असणाऱ्या सेक्टर 50 मधील घरी इनकम टॅक्स विभागानं धाड टाकली. यामध्ये जवळपास पाच कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. 


धाड टाकण्यासाठी दाखल झालेलं पथक जेव्हा तळघरात पोहोचलं तेव्हा त्यांना इथे 600 हून जास्त लॉकर मिळाले. आतापर्यंत यापैकी तीन लॉ़करत उघडण्यात आले आहेत.   


कोण आहेत आयपीएस आर. एन. सिंह? 
राम नारायण सिंह उत्तर प्रदेश कॅडर आणि 1983 बॅचचे आयपीएस अधिकारी. डीजी रँकवर त्यांची निवृत्ती झाली. सेक्टर 50 मध्ये असणाऱ्या त्यांच्या घरात मुलगा सुयश हा त्याच्या कुटुंबासमवेत राहतो. 


तर, खुद्द सिंह मिर्झापूरला राहतात. असं म्हटलं जातं की सिंह यांची पत्नी ‘मानसम कंपनी’ नावाची एक कंपनी चालवतात. जी नागरिकांना भाडेतत्वावर लॉकर देते. 


दरम्यान, आयकर विभागानं सोमवारी धाड टाकल्यानंतर नोटा मोजण्याचं यंत्र घटनास्थळी मागवलं.


 


हे त्यांचं जुनं काम असल्याचं कळत आहे. इथं लॉकर देणाऱ्यांचा केवायसी मिळालेले नाहीत. 


ही माहिती सुयश सिंह यांच्या नावे व्हायरल होणाऱ्या पत्रातून समोर आली आहे. आपण इनकम टॅक्स विभागाला आवश्यक ती कादगपत्र दिली आहेत. शिवाय त्यांनीही यावर कोणती हरकत दर्शवली नाही असं या पत्रात म्हटलं गेलं आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार लॉकरमधून रोकड आणि काही दागिने मिळाले आहेत. यांच्या माहितीमध्ये अनियमीतता आढळून आली आहे. तर काही लॉकर मालकांची माहितीही मिळालेली नाही. तेव्हा आता या प्रकरणाला पुढे