Andhra rape-murder : आंध्रप्रदेशमधल्या एका घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. इथल्या नांदयाल (Nandyal) जिल्ह्यात 7 जुलैला एक भीषण घटना घडली. सहावी आणि सातवीत शिकणाऱ्या काही मुलांनी आठ वर्षांच्या एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. धक्कादायक म्हणजे या मुलांच्या पालकांनी तिचा मृतदेह (Murder) नदीत फेकून दिला. यामागचं कारण आता समोर आलं आहे. कृत्य करण्याच्या आधी या मुलांनी मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ पाहिला. व्हिडिओत दाखवलं तसंच करण्याची उत्सुकता त्या मुलांमध्ये निर्माण झाली. यातूनच तीन मुलांनी आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालकांना मृतदेह नदीत फेकला
नांदयाल जिल्ह्याचे पोलीस अधिकारी अधिराज सिंह राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांनी केलेल्या कृत्याने त्यांचे वडिल आणि काका घाबरले. आपल्या मुलांविरोधात गुन्हा दाखल होईल या भीतीने त्यांनी मुलीच्या मृतदेहाला मोठा दगड बांधला आणि कृष्णा नदीत फेकून दिला. या प्रकरणाती दोन आरोपी मुलं 12 वर्षांची आहेत. ही दोन्ही मुलं सहावीत शिकतात, तर तिसरा मुलाग 13 वर्षांचा असून तो सातव्या इयत्तेत शिकतो. मृत मुलगी ही त्याच शाळेत तिसरीस शिकत होती. मुलांना 10  जुलैला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 


चौकशीत मुलांनी पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ पाहिल्यानंतर 8 वर्षांच्या मुलीला या तीन मुलांनी खोटं बोलून जंगलात नेलं, तिथे तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर मुलीचा मृतदेह त्यांनी जवळच्या कोरड्या नाल्यात ठेवला. कृत केल्यानंतर घाबरलेल्या मुलांनी याची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. पण मुलांच्या कुटुंबियांनी पोलिसात माहिती देण्याऐवजी मुलीचा मृतदेह कृष्णा नदीत फेकून दिला. याप्रकरणी एका मुलाच्या वडिल आणि काकाला अटक करण्यात आली आहे. 


मुलीच्या मृतदेहाचा शोध 
मुलीचा मृतदेह अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रोन आणि पाण्यात खोलपपर्यंत जाणाऱ्या कॅमेराच्या सहाय्यने मुलीच्या मृतदेहाचं शोधकार्य सुरु आहे. यासाटी पोलिसांनी एनडीआरएफचीही मदत घेतली जात आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.


लहान मुलांना मोबाईलचं व्यसन


या घटनेने पुन्हा एकदा मोबाईलच्या दुष्परिणामचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुलांना मोबाईलचं व्यसन लागलं आहे. पालकही याकडे दुर्लक्ष करतायत, आणि याचे परिणाम म्हणजे अशा घटना घडत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.