Heart Attack CCTV Viral Video : बदलत्या दैनंदिन जीवनशैलीमुळे माणसाच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येतंय. धगधगत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा (Heart Attack) झटका येण्याचं प्रमाण देखील वाढलंय. नुकतंच मुंबई महापालिकेने (BMC) दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील वर्षी 2022 मध्ये मुंबई शहरात प्रतिदिन 25 ते 26 नागरिकांचा मृत्यू हृदयविकाराचा झटक्याने झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशातच आता एका व्हिडिओने (CCTV Viral Video) सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं दिसून येतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशातील (MP News) खरगोन जिल्ह्यात चालत्या बसमध्ये कंडक्टरला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (CCTV Video) झाली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ केवळ 30 सेकंदांचा आहे, ज्यामध्ये कंडक्टरला अचानक हार्टअटॅक आल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.


नेमकं काय झालं?


नेहमीप्रमाणे बस आपल्या मार्गावर प्रवासी घेऊन धावत होती. कंडक्टरने प्रवाशांची तिकिटं काढली आणि आपल्या जागेवर येऊन बसला. बस प्रवाशांनी भरलेली नव्हती. बसल्या बसल्या कंडक्टरला अस्वस्थ वाटू लागलं. त्याने मानेवरून हात फिरवला. तसेच तोंडावरून हात फिरवला. थोड्याच वेळात त्याचे डोळे फिरले आणि त्याचं शरीर सरळ व्हायला लागलं. शेजारी बसलेल्या वृद्ध दामपत्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी कंडक्टरला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र फक्त 30 सेकंदात कंडक्टरचा मृत्यू झाला.


पाहा Video



आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मगरखेडी गावाजवळ ही घटना घडली. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, कंडक्टरला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. हे प्रकरण खरगोन जिल्ह्यातील बलकवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील खलटाका पोलीस चौकी परिसरातील सांगितलं जात आहे. 


आणखी वाचा - मृत्यूच्या आदल्या रात्री...; Aditya Singh Rajput ची शेवटची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल!


दरम्यान, गेल्या काही वर्षात हृदयविकाराचा झटका, कर्करोग, क्षयरोग आदी कारणामुळे होणाऱ्या मृत्यूंचेही प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. अवेळी जेवण, योग्य आहार न घेणं, सततचं जागरण या कारणांमुळे आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे.