Crime News : आपल्या लाडक्या बकऱ्याच्य मृत्यूने (Goat Death) एका महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याने तिच्या पतीने तिला रुग्णालयात दाखल केलं. पण रात्री गुपचूप ती रुग्णालयाबाहेर पडली आणि रुग्णालयाबाहेर असलेल्या एका झाडावर ओढणीळे गळफास घेत तीने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अधिक तपास केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
ही घटना उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) कन्नोज जिल्ह्यातील आहे. इथल्या ठठिया या गावात प्रमोद नावाचा व्यक्ती पत्नी आणि सात मुलांसह राहातो. त्याची पत्नी बेबी हिने बुधवारी मेडिकल कॉलेजच्या समोर असलेल्या एका झाडाला ओढमी बांधून गळफास घेतला. यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. सकाळी काही लोकांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, पण उपाचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. पती प्रमोदने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घरात एक बकरा होता. त्या बकऱ्याचा काही दिवासांपूर्वी अचानक मृत्यू झाला. प्रमोदची पत्नी बेबी या बकऱ्याची देखभार करायची.


पण बकऱ्याच्या मृत्यूनंतर ती नैराश्यात गेली, याचा परिणाम तिच्या मानसिक परिस्थितीवर झाला. दिवसेंदिवस तिची तब्येत बिघडत चालल्याने पती प्रमोदने तिला रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. बुधवारी रात्री ती रुग्णालयातून अचानक बाहेर पडली. त्यानंतर तिने झाडाला लटकून आत्महत्या केली. पत्नीच्या मृत्यूने पती प्रमोदवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रमोद आणि बेरीच्या लग्नाला 12 वर्ष झाली. त्यांना सात मुलं आहे. यात पाच मुली आणि दोन मुलं आहे. आता पत्नीच्या मृत्यूने सात मुलांच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरपलं आहे. 


'पतीने तृतीयपंथियाशी केलं लग्न , पत्नीला समजलं'
दरम्यान, बिहारमधल्या आरा जिल्ह्यात एक विचित्र घटना घडलीय. पतीने तृतीयपंथियाबरोबर लग्न केल्याची बातमी पत्नीला समजली. यानंतर तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या महिलेने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे ही महिला चार महिन्यांची गरोदर आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या तृतीयपंथियाबरोबर लग्न केलं. लग्नानंतर पती त्या तृतियपंथियाबरोबरच राहू लागली. इतकंच नाही तर पत्नीला तो खर्चासाठी पैसे देत नव्हता. त्यामुळे नैराश्यातून पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला.