Kanpur Student News : एका अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात काही तरुणांनी पैसे वसूल करण्यासाठी पीडित मुलाला जबर मारहाण केली. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर या तरुणांनी पीडित मुलाला नग्न करुन त्याच्या प्रायव्हेट पार्टला विट बांधली आणि त्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित मुलाने सांगितली आपबिती
व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कठोर कारवाई करत आरोपी तरुणांना अटक केली आहे. पीडित मुलाने पोलिसांना सांगिलेली कहाणी मन सुन्न करणारी आहे. उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्येही (Kanpur) संतापजनक घटना घडली आहे. पीडित मुलगा तब्बल 6 दिवस आरोपींच्या कैदेत होता. या सहा दिवसातला प्रत्येक क्षण आपल्यासाठी नरक यातना देणारा होता असं पीडित मुलाने सांगितलं. आपण जिवंत राहाणार नाही असे विचारही त्याच्या मनात आले. पीडित तरुण वायूदलात भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी कानपूरमध्ये आला होता. कानपूरमध्ये तो एका भाड्याच्या घरात राहात होता.


पैसे वसूल करण्यासाठी बेशुद्ध होईपर्यंत मारहण केली जात होती. बेशुद्ध झाल्यावर पुन्हा अंगावर पाणी टाकून उठवलं जायचं आणि पुन्हा लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली जात असल्याचं पीडित तरुणाने सांगितलं. 


20 हजाराच्या बदल्यात 50 हजारांची मागणी
पीडित तरुणाने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी पीडित तरुणाला ऑनलाईन गेम खेळण्याची जबरदस्ती केली. यासाठी त्याला 20 हजार रुपये दिले. पहिल्यांदा ऑनलाईन गेम जिंकल्यानेतर आलेले पैसे त्यांनी पुन्हा त्या गेममध्ये लावले. पण यावेळी तो हरला. पैसे गेल्याने आरोपी तरुणाने पीडित तरुणाकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. 50 हजार रुपये द्यावे लागतील असं त्याला सांगण्यात आलं. पण पीडित तरुणाने इतके पैसे देणं शक्य नसल्याचं सांगितल्यावर आरोपींनी 21 एप्रिल ते 26 एप्रिल असे सहा दिवस पीडित तरुणाला एका रुममध्ये बंद केलं. त्यानंतर त्याला जनावरांसारखी मारहाण करण्यात आली. 


आरोपींकडून अश्लील कृत्य
आरोपींनी पीडित तरुणाला लाथा-बुक्क्यांनी तसंच पट्ट्याने मारहाण केली. पण यातून मन न भरल्याने त्यांनी पीडित तरुणाच्या प्रायव्हेट पार्टला विट बांधून त्याचा व्हिडिओ बनवला. धक्कादायक म्हणजे या सर्व प्रकाराचे आरोपींनी तब्बल 31 व्हिडिओ बनवले. पीडित तरुणाने आपल्या लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही केला आहे. पण अद्याप पोलिसांनी याबाबत आरोपींवर कलम लावलेलं नाही.


11 आरोपींविरुद्ध गुन्हा
याप्रकरणी पोलिसांनी एकूण 11 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातल्या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपी फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथकं तयार करण्यात आल्याची माहिती कानपूरच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे.