Shocking News : क्रिकेटच्या मैदानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक धाव घेण्याच्या नादात एक तरुण जीवाच्या आकांताने धावला पण काही तो पावलांवरच कोसळला आणि पुन्हा उठलाच नाही. अवघ्या 16 वर्षांच्या या मुलाचा क्रिकेटच्या (Cricket) मैदानावरच मृत्यू झाला. मैदानावर उपस्थित असलेल्या इतर मुलांनी त्याला रुग्णालयात नेलं, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार हार्ट अटॅकने (Heart Attack) त्याचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
ही दुर्देवी घटना उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) जिल्ह्यातील बिल्होर गावची आहे. बिल्होरमधल्या बीआईसी मैदानावर क्रिकेटचा सामना सुरु होता. 16 वर्षांचा अनूज पांडे या तरुण फलंदाजी करत होता. धाव घेताना अनूजला हार्ट अटॅक आला आणि तो जागेवरच कोसळला. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार अनुजला कोणताही आजार नव्हता. 


अनुज मैदानावरच कोसळताच इतर मुलांनी त्याला उचललं, त्याचे हात-पाय चोळले, पण अनुजकडून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे इतर मुलांनी अनुजला रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 


शिंक आली आणि मृत्यू झाला
काही दिवसांपूर्वी अशीच एक धक्कादायक घटना मेरठमध्ये घडली होती. 25 वर्षांच्या एका मुलाचा शिंक आल्यानंतर मृत्यू झाला. मृत्यूचा हा लाईव्ह थरार रस्त्यावरच्या एका सीसीटीव्हीत कैद झाला होता. चार तरुण रस्त्यावरुन गप्पा मारत चालत होते. त्याचवेळी चारमधल्या एका तरुणाला शिंक येते. शिंक आल्यानंतर त्या तरुणाच्या घशात काही तरी झाले. त्याच अवस्थेत काही पावलं चालत नाही तोच तो तरुण अचानक रस्त्यावर कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.


वरमाला घालताना वधूचा मृत्यू
लखनऊमध्ये अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. 20 वर्षांची वधू वराला वरमाला घालताना अचानक कोसळली. तिचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना लखनऊमधल्या महिलाबाद इतल्या भदगावमधील आहे. काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेशमधल्या कटनी इतं साई बाबांच्या मंदिरात डोकं टेकवण्यासाठी आलेल्या एका भाविकाचा मंदिराच्या पायऱ्यांवरच हार्ट अटॅकने मृत्यू झाला.