पाटणा : तुम्ही हे बऱ्याचदा पाहिले किंवा ऐकले असेस की, बऱ्याच शहरात विवाहसोळ्यांमध्ये गोळीबार केला जातो. परंतु प्रकारामुळे बऱ्याच लोकांचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे पोलिसांनी आता या प्रकरणांवरती बंदी आणली आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे एकामागून एक असे अपघात होऊनही लोक स्वतः यामधून काहीच शिकत नाहीत. आज पाटणा येथून अशीच बातमी समोर आली आहे, जिथे लग्नात गोळीबार करताना नवरदेवाच्या भावाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर लग्नघरात एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना अरवाल जिल्ह्याला लागून असलेल्या मुरारचक गावात घडली. हे गाव पाटणा जिल्ह्यातील सिगोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते, जिथे भोजपूर जिल्ह्यातील चांडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सलेमपूर येथून लग्नाची वरात निघाली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, भोजपूर जिल्ह्यातील चांडी पोलीस ठाण्याच्या सलेमपूर येथील रहिवासी जयमंगल यादव यांचा मुलगा अप्पू यादव याची बुधवारी रात्री वरात काढण्यात आली, त्यानंतर जेव्हा वरात नवरीच्या दरवाज्यावर आली तेव्हा जयमलच्या विधी सुरू होत्या त्यादरम्यान वरातीमध्ये हजर असलेल्या लोकांकडून गोळीबार सुरू झाला. त्याचवेळी वराचा भाऊ अमरेंद्र कुमार उर्फ​पप्पू याला गोळी लागली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याचा मृत्यू झाला.


या पप्पू यादव याला एक भाऊ आहेत आणि तो सर्वात लहान होता. लग्न झालेला मोठा भाऊ रेल्वेत नोकरीला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी मृत्यू झालेल्या तरुणाची दिवाणी न्यायालयात स्टेनोग्राफर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.


दानापूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला
गोळी लागल्याने वराच्या भावाला पाटणा येथील रुबन रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नातेवाइकांनी त्याला दानापूर येथील खासगी रुग्णालयात नेले, तेथे त्याचा मृत्यू झाला.


या दु:खद घटनेनंतर विवाह सोहळा अर्धवट राहिला, लग्नाची मिरवणूक त्याच दिवशी घरी परतली होती. लग्नसमारंभ अर्धवट राहिल्यामुळे नववधूला घरी आणायला निघालेले हे वऱ्हाडी अखेर नववधू न घेताच घरी परतले.